दैनिक जागृत भारत कडून “धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या” सर्वाना मंगलमय शुभेच्छा.

ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवfले आणि 14 ऑक्टोबर इ.स. 1956 रोजी नागपूरमध्ये आपल्या 5,00,000 अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ही धम्मभूमी दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.
या दिवसाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात. यामध्ये कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धर्मात प्रवेश करतात.
धम्म : बुध्द तत्वज्ञानानुसार जीवन जगण्याचा मार्ग
☸चक्र : त्या मार्गावरून चालण्याचा अनिष्ट प्रथांचा त्याग करून परीशुद्ध धम्माचा स्वीकार करण्याची संपूर्ण प्रक्रिया
प्रवर्तन : या प्रक्रियेला वेग देऊन ती गतिमान करणे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत