माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरोधात माना समाज आक्रमक.

एका कार्यक्रमात काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपण सत्तेत आल्यास माना समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान केले होते. यावरून माना समाजाने मोघेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून कुरखेड्यात आज मोठ्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी मोघेंविरोधात पोलिसांत तक्रारही देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी नागपूर येथे पार पडलेल्या आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपली सत्ता आल्यास वरिष्ठ आयोग नेमून अनुसूचित जमाती प्रवर्गात चुकीने समावेश करण्यात आलेल्या माना समाजाला काढून टाकू असे विधान केले होते. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी उपस्थित होते. मोघेंच्या या वादग्रस्त विधानावरून माना समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे.
शुक्रवारी कुरखेडा शहरात माना समजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. शिवाजीराव मोघेंचे वक्तव्य हे द्वेषभावनेतून आहे. त्यांनी संपूर्ण माना समाजाचा अपमान केला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे. असा आरोप मोर्चेकऱ्यांनी यावेळी केला. यावेळी पोलिसातदेखील तक्रार देण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत