मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आंबेडकरांच्या दवाखान्यात…सुधीर कांबळे

एकदा सर्व वर्गातल्या थरातल्या कृतघ्न भेकड
आणि विकृत मानसिकतेची शल्यचिकित्सा
करून घ्या डॉक्टर आंबेडकरांच्या दवाखान्यात !

डॉक्टर आंबेडकर निष्णात सर्जन आहेत
धर्माचे समाजाचे तत्वज्ञानाचे लोकशाहीचे
कायद्याचे मानवतेचे न् आधुनिक विचारांचे

त्यांच्या – आमच्यातला ऋणानुबंध रक्ताचा
प्रेमाचा निर्व्याज्य निर्मळ अशा आपुलकीचा !

जागवलय त्यांनी आम्हाला कान उपटून
शतकानुशतकांच्या पाषाण निद्रेतून आणि
घडवलय पुनरुत्थान बुध्दांच्या हवाली करून !

आता या देशाच्या मध्यवर्ती सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ दवाखान्याच्या भिंतींना सत्तेच्या उन्मादाने
कुरतडत आहेत रोगट उंदीर अन् घुशी संसर्गित !

इतक्या दुबळ्या नाहीत या भिंती अभेद्य चिवट
ते असताना तुम्हाला पेलताच आले नाही वादळ
पण आता तरी विचारप्रवृत्त होऊन या दवाखान्यात

तुमच्या मेंदुंच्या पेशीत पोसलेल्या स्वार्थी सनातनी दुर्गुणी समाजघा तक अंडी पिलांवर योग्य संस्कार होऊन बुद्धिप्रामाण्यवादी होईल काया मन फुकट !

चिकित्सा न् उपाय झाला की अर्थ कळेल सर्वांना
स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाचा अन् जीवनाचा

मग येतायना सर्व निर्मळ निष्पाप निस्वार्थ मनाने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दवाखान्यात !

©
सुधीर कांबळे
पुणे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!