संत शिरोमणी रविदास महाराजांच्या पुतळ्यासाठी त्याजागेवर महापालिकेने ताबा द्यावा ! राष्ट्रीय चर्मकार महासंघाची निवेदनाद्वारे मागणी.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ व पुतळा समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली – उगले यांच्याकडे निवेदनाद्वारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिलेल्या जागेवर ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर शहरात चर्मकार समाज खुप मोठया संख्येने वास्तव्यास असून राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रणित सोलापूर शहर जिल्हा संत रोहिदास महाराज पुतळा समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेकडे संत रोहिदास महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महानगरपालिकेने मंजूर केलेला ठराव क्र. ३९ दि.१५ जून २०११ रोजी सोलापूरातील रंग भवन चौक ते सात रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या (नाना-नानी पार्क ) येथील उद्यान मधील सिटी बसटॉप लगत असलेल्या एका कॉर्नरला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा पुतळा बसविण्यास मान्यता दिलेली आहे.
तरी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने व संपूर्ण चर्मकार समाजाच्या वतीने लोकवर्गणीतून आम्ही आपण उपलब्ध करून दिलेल्या जागेवर पुर्णाकृती पुतळा बसविणार आहोत. परंतु पुतळा बसविण्या संदर्भात दिलेली जागा आजतागायत आम्हाला महानगरपालिकेकडून देण्यात आलेली नाही. तरी त्वरीत समाजास जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत