देश-विदेशमुख्यपान

बिहारमध्ये मोठी रल्वे दुर्घटना, नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे ५ डबे रुळावरुन घसरले.

बक्सर: दिल्लीहून कामाख्याला जाणाऱ्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. ट्रेनच्या ५ बोगी रुळावरुन घसरल्या आहेत. डीडीयू पाटणा रेल्वे विभागाच्या रघुनाथपूर स्टेशनवर ही घटना घडली. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ही ट्रेन दिल्लीहून पाटण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही ट्रेन बक्सर जंक्शनवरून पाटण्याकडे रवाना झाली होती. त्यानंतर ही गाडी रघुनाथपूर रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली. त्यानंतर इतर गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. ही ट्रेन बक्सर ते आरा आणि नंतर पाटणा येथे थांबते. रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा नव्हता. या घटनेची कारणं अद्याप समजू शकलेली नाहीत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!