महाराष्ट्रमुख्यपान

समनक जनता पार्टीने केले रास्ता रोको आंदोलन.

कारंजा आणि मानोरा तालुक्यात बहुतांश वनक्षेत्र असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा मो प्रमाणात प्रास आहे. शेतीचे मी प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार तक्रार केली जात आहे. मात्र, याबाबत कुठेही दखल घेतली जात नाही.

शेतकयांच्या या मागण्यांसाठी समनक जनता पार्टीने वनविभागास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या माध्यमातून वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या जीवांचेच पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्याबाबत उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उपायोजना राबवावी, वनविभाग व वन्यजीव वनपरिक्षेत्राकडून जोपर्यंत वनपरिक्षेत्रात शेतक-यांची जीवितहाणी तसेच नुकसानीची भरपाई सरसकट देण्यात यावी. आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकयांच्या या मागण्यांसाठी समनक जनता पार्टीने

आधीच आंदोलन जाहीर केल्यामुळे कारंजा व मानोरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी सकाळी साडेअकरा वाजता बायपास परिसरात रस्ता रोखून धरला. आणि जय मानवता, जय संविधान हा पक्षाचा नारा देऊन वनविभाग व शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे बायपास परिसरात असलेल्या सर्व रस्त्यांवर शेकडो वाहने थांबली होती. समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्णा कालापाड, राष्ट्रीय नेते प्रा. डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या मार्गदर्शनात कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष प्रकाश – बळीराम राठोड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल राठोड, जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, महिला जिल्हाध्यक्ष शितल राठोड, कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी आक्रमक स्वरूपात भाषण करून शेतकऱ्यांच्या मागण्या उजागर केल्या. यावेळी वनविभाग प्रादेशिक वाशिम ने सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो ) छत्रपती चव्हाण यांनी आंदोलनास भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्विकारले आणि पूर्ततेसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या आंदोलनाला गोरसेना, धनगर समाज युवा महार सेना, शेतकरी संघटनेचे गजानन अहमदाबादकर यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनासाठी राजेश राजेश मोटे, प्रकाश राठोड, प्रमिला आहे. शर्मिला राठोड, मंगरुळपीर महिला तालुकाध्यक्ष नीता चव्हाण, कल्पना राठोड, लता राठोड, मीरा राठोड, शेषराव चव्हाण, सुनील जाधव, संदेश राठोड, रुपेश राठोड, सुरेश पवार, दिलीप कोळकर, शामकुमार चव्हाण, विष्णू राठोड, रोहिदास राठोड, सुनील जाधव, रुपेश राठोड, अमोल राठोड, पुंडलिक राठोड, रितेश जाधव, पंजाब चव्हाण, वसंत राठोड, बाळू चव्हाण, अरविंद जाधव, प्रल्हाद चव्हाण, धनराज जाधव, किरण चव्हाण, महेश चव्हाण, प्रकाश चव्हाण, गणेश चव्हाण, बाबूसिंग राठोड, सेवक राठोड, कैलास चव्हाण, नामदेव जाधव आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!