अत्यंत दुःखद… अत्यंत वेदनादायी तसेच धक्कादायक बातमी म्हणजे आमचे परममित्र मिलिंदजी फुलझेले यांचे दुःखद निधन!!

जेमतेम महिनाभर सुद्धा झालं नसेल आम्ही अत्यंत सविस्तर अनेक विषयावरती बोललो.. म्हणाले माझा एक्सीडेंट झाला आहे त्यामुळे पायाला दुखापत झाली आहे.एवढेच ते बोलले. बाकी काही बोलले नाही. त्यांच्या ह्या आकस्मित जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीचे अतोनात नुकसान झालेले आहे असे माझे स्वतःचे मत आहे. अत्यंत परखडलेखक, अत्यंत निर्भीड मांडणी, प्रखर आंबेडकरवाद त्यांच्या लेखनातून मला दिसायचा.. इतर वर्तमानपत्र लेखनाबरोबरच महानायक ते बहुजन सौरव या वर्तमानपत्रातून त्यांच्या विचारांची छाप स्पष्टपणे दिसायची. आपण अत्यंत निर्भीड पत्रकाराला गमावले आहे…मी डी एस सावंत आणि परिवार, त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील आहे.
त्यांना सद्गती प्राप्त हो..
विनम्र भावपूर्ण आदरांजली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत