शिंदे सरकार खुनी सरकार-सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्रिपल इंजिन सरकार हे खुनी सरकार आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सध्याच्या सरकारचा कारभार आपण सर्व जण पाहत आहात. ज्या पद्धतीने या लोकांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, त्यामुळे लोकांच्या मनात या सरकारविषयी रोष आहे, असेही त्या म्हणाल्या.अमरावतीत प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आयकर, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून कोविड काळात चांगली कामगिरी करणारे उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले आहे. साम, दाम, दंड, भेद हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द अजूनही मला आठवतात. काहीही करा, पण जिंका, असे ते म्हणतात.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत