आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपान

एलपीजी सिलिंडरच्या किमती २०९ रुपयांची वाढ

महागाईच्या दणक्याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. ऑईल मार्केटिग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली असून त्याअंतर्गत १९ किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलिंडर २०९ रुपयांनी महागला आहे. ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव आणि दसऱ्यासारखे सण आहेत. अशातच तेलाच्या किमती वाढवल्याने याचा सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे.

दरम्यान, २०९ रुपयांच्या वाढीनंतर नवी दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १,७३१.५० रुपये इतकी होणार आहे. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली होती. आता एका महिन्यातच सिलिंडरच्या किमतीत २०९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!