महाराष्ट्रमुख्यपान

सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची आहे ; वडेट्टीवार आक्रमक

दि.28. महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीमध्ये प्रवेश नसल्याचे कारण देत एका गुजराती व्यक्तीने महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून सरकारला गुजराती लोकांची हुजरेगिरी करायची आहे, असं विधान केलंय.
त्रृप्ती देवरुखकर या महिलेने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिला ऑफिस शोधण्यासाठी मुंबईतल्या मुलुंड पश्चिम येथे गेली होती. ऑलनाईल पत्ता मिळाल्यानंतर महिला शिवसदन सोसायटीमध्ये गेली होती. त्यावर येथे महाराष्ट्रीयन लोकांना परवानगी नसल्याचे महिलेला सांगण्यात आले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागपूरमध्ये बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, बाप्पा ने जाताना सरकारला सद्बुद्धी द्यावी ही प्रार्थना आहे. मला सकाळी एका बुलढाण्यातील शेतकऱ्याचा कॉल आला त्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. सरकारकडून मदत मिळत नसल्याचं त्याने म्हटलं. ”राज्य शासनाचे आदिवासी विद्यार्थ्यांकडेही लक्ष नाही. मंत्री फक्त टेंडरकडे लक्ष देऊन आहेत. त्यामुळे सरकारला थोडीदेखील लाज वाटली पाहिजे. आदिवासी विद्यार्थांना विदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती अजून मिळालेली नाही”

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!