सिमेंटचे भाव वाढण्याची शक्यता.

दि.28. घर बांधणीसाठी सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमेंट. सिमेंटच्या भावात सध्या चढउतार होत आहेत. सध्या पावसामुळे अनेक कामे बंद आहेत. तरीही सिमेंटच्या भावात वाढ होताना दिसत आहे. १ ऑक्टोबरपासून सिमेंटचे दर प्रति बॅर १५ रुपयांनी वाढणार आहेत.
कंपन्यानी डिलर्सना याबाबत माहिती दिली आहे. उत्पादनाचा खर्च वाढल्याने सिमेंटचे दर वाढणार आहेत. ऑगस्टपासून सिमेंट 310 ते 320 रुपये प्रति बॅग विकल्या जात होत्या. परंतु याच किंमती 1 सप्टेंबरपासून 50 रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे या किंमती 350 प्रति बॅगवर पोहचल्या आहेत.
आता कंपन्यानी पुन्हा एकदा भावात वाढ केल्याने 400 रुपये प्रति बॅग सिमेंट होईल. याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर होणार आहे. पाऊस संपल्यावर बांधकाम व्यवसायात वेग येतो. त्यामुळे या किंमती वाढण्यात येत आहेत.
छत्तीसगड राज्य देशाच्या गरजेच्या एकूण २० टक्के उत्पादन करतो. सिमेंट उत्पादनात छत्तीसगड हे प्रमुख राज्य आहे. या राज्यात सिमेंट कंपन्यांचे १४ प्लांट आहे. यांचे वार्षिक उत्पादन २६० लाख रुपये आहे. आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात मोठे सिमेंट उत्पादक राज्य आहे. राजस्थान आणि त्यानंतर कर्नाटक हे राज्य सिमेंट उत्पादन क्षेत्रातील मोठी राज्ये आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत