मणिपूरमध्ये दोन विद्यार्थ्यांची हत्या.

मणिपूरमध्ये दोन विद्यार्थी बेपत्ता झाले होते, त्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत.
जुलै महिन्यात मणिपूरमधून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत त्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याआधी मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता या दोन विद्यार्थ्यांची हत्या झाली असून त्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शस्त्रधारी व्यक्तीही दिसत आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह मात्र अद्याप मिळालेले नाहीत.
ज्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो समोर आले आहेत ते दोन्ही विद्यार्थी मैतेई समुदायाचे आहेत. एकाचं नाव हिजाम लिनथोइंगबी तर दुसऱ्याचं नाव फिजाम हेमजीत असं आहे. पांढऱ्या टीशर्टमध्ये लिनथोइनगांबी आहे तर हेमजीत चौकटीच्या शर्टमध्ये दिसतो आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत