ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील? जाणून घ्या.

पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये अनेक सण येणार आहेत. अशा परिस्थितीत बँकांना सुट्ट्या असणार आहेत. तुम्हालाही बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला नंतर त्रास होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार, पुढच्या महिन्यात ऑक्टोबर 2023 मध्ये बँका काही दिवशी बंद राहतील. प्रादेशिक सुट्ट्या राज्य सरकार ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात देशभरात बँकांना एकूण 16 दिवस सुट्या असतील. महाराष्ट्रात एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात 5 रविवार येतात. यासोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते म्हणजेच या 7 सुट्ट्या संपूर्ण देशात लागू होतील. अशा स्थितीत पुढील महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत ते जाणून घ्या.
ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?
1 ऑक्टोबर- रविवार
2 ऑक्टोबर- गांधी जयंती
8 ऑक्टोबर- रविवार
14 ऑक्टोबर- शनिवार
15 ऑक्टोबर- रविवार
22 ऑक्टोबर- रविवार
24 ऑक्टोबर- दसरा/ विजयादशमी
28 ऑक्टोबर- चौथा शनिवार
29 ऑक्टोबर- रविवार
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत