डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र महागौरव २०२५ पुरस्कार

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार सोलापूरातील
मनोरुग्णांसाठी कार्य करणारे संभव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आतिश सिरसट यांना जाहीर
मान्यवर महोदय,
डिजिटल पत्रकारांची भारतातील पहिली संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या संघटनेच्या पुरस्कार निवड समितीने महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कारसाठी
आतिश सिरसट यांची निवड केली असून येत्या २५ मे रोजी पुण्यात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होणार असून मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते व ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे व आयुष्यमान भारत महाराष्ट्र समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे
सोलापूरच्या आतिश सिरसट यांनी संभव फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील गंभीर आणि दुर्लक्षित समस्येवर दिशादर्शक चळवळ उभी केली आहे. बेवारस मनोरुग्णांच्या जीवनात परिवर्तन घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करीत. तीनशेहून अधिक मनोरुग्णांचे कौटुंबिक पुनर्वसन
संभव फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले असून अविरतपणे हे कार्य सुरू आहे याच योगदानाची दखल घेत
त्यांना गौरविण्यात येणार आहे.
*आपला विनीत*
आतिश कविता लक्ष्मण सिरसट
(अध्यक्ष संभव फाऊंडेशन सोलापूर)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत