दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

१० मे- अँड.प्रकाश आंबेडकर वाढदिवस.🔹

🔹१० मे चा दिवस उजाडला मीराबाईंना पहिला मुलगा झाला. सर्वत्र आनंद पसरला. यशवंतरावांना मुलगा झाला ही बातमी नातेवाईकात पसरली. शेजारच्या, दूरच्या आयाबाया लहान बाळाला पाहायला यायच्या. बाळाला पाहायच्या त्यात एखादी म्हातारी असायची. ती बाळाला पाहताच म्हणायची हा तर बाबासाहेबांसारखाच दिसतो.
यशवंतरावांनी मुलाचे नाव ठेवण्याबाबत चर्चा केली होती. सर्वानुमते मुलाचे नाव प्रकाश ठेवण्याचे ठरले.१२ दिवसांनी राजगृहात आनंदाचे वातावरण होते. भैय्यासाहेबांच्या मुलाचा नामकरणविधी आज संपन्न होणार होता. राजगृहात बरेच पाहुणे आले होते. संध्याकाळी नामकरण विधी संपन्न झाला. भैय्यासाहेबांनी बाळाचे नाव ‘प्रकाश’ ठेवले. आलेली पाहुणे मंडळी रात्रभर थांबून निघून गेली. पण तरीही घर मात्र भरल्या भरल्या सारखे वाटायचे.बाळ प्रकाशचा आवाज त्या राजगृहात सतत ऐकू येत होता. रमाबाईंच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने १० मे १९५४ पासून राजगृह आनंदाने न्हाऊन निघाले.!!!
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मंगलमय कामना.🎂🎂🎂
( संदर्भ- लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर, लेखक- प्रा. प्रकाश जंजाळ पान नं. ८२)
▪️ शुभेच्छुक ▪️
आयु. प्रशांत चव्हाण सर.
केंद्रीय शिक्षक
भारतीय बौद्ध महासभा
श्रीगोंदा तालुका.💐💐💐

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!