दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारत देशाची खुप मोठी प्रेरणा आहे :- राणा पाटील

नळदुर्ग शहरात भव्य समता रॅलीचे आयोजन

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रभाव प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचे प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाची खुप मोठी प्रेरणा आहेत
सर्व नागरीकानी बाबासाहेब वाचला पाहिजे तेव्हाच बाबासाहेब सर्वांना कळतो आसे परखड मत
तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले .
नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्या प्रसंगी आपले मत व्यक्त करताना बोलत होते .
यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नंदकिशोर सोळुंके , शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष [ शिंदे गट ] ज्ञानेश्वर घोडके , कुलस्वामीनी बोअर चे मुख्य प्रवर्तक चंद्रकांत बनसोडे , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे , भाजपाचे नेते सुशांत भुमकर , शहराध्यक्ष धिमाजी घुगे , श्रमीक पोतदार , माजी नगरसेवक निरंजन राठोड , बबन चौधरी , अदिजन उपस्थित होते . महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयत्ती कमिटी चे प्रमुख राजरत्न बनसोडे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , पत्रकार दादासाहेब बनसोडे , माजी नायब सुभेदार योगेश दुरुगकर जयकुमार गायकवाड , विठ्ठल बापू बनसोडे
किशोर के बनसोडे , आमोल कांबळे
अजयकुमार बागडे , सुरज कांबळे , सोनू बनसोडे , खंडु गायकवाड अतुल बनसोडे योगेश सुरवसे , बापू दुरुगकर ,बाबासाहेब बनसोडे , महादेव कांबळे संभाजी कांबळे , सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा शिवाजी बनसोडे से नि उपप्राचार्य प्रा भगवान चिमणे , प्रा डॉ पंडीत गायकवाड आयाप्पा भांगे अदिनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले नळदुर्ग शहरात विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी बौद्ध विहारापासुन समतेचा संदेश देत लहान मुला सह मोटर सायकल रॅली काढण्यात आली व बसस्थनका समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात फटाक्याची अतिषबाजी करत जयजयकार करण्यात आला . इंदिरानगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक मारुती खारवे , यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
जी एम चौकात सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या हस्ते पुजन करण्यात आले तर डॉ आंबेडकर चौकात तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले .
प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन करून यावेळी सर्वांना बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी त्रिशण पंचशिल दिले
आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार दादासाहेब बनसोडे यांनी मानले . यावेळी नळदुर्ग ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक नंदकिशोर सोळुंके , उप निरीक्षक इश्वर नांगरे पोलीस उप निरीक्षक गिते , सह पोलीस कर्मचाऱ्यानी खुप चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त लावला होता .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!