महाराष्ट्रमुख्यपान

“आता लवकरच ऑनलाइन बघता येणार राज्य सरकारकडे जमा झालेले कुणबी दस्तावेज .”

 सर्व दस्तावेज ऑनलाइन उपलब्ध करण्यासाठी सरकारकडे प्रक्रियेला सुरुवात केली असून १९६७ पूर्वी असलेले जाती आणि वंशावळींचे पुरावे व दस्तावेज, अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय ज्या मराठ्यांकडे निजामकालीन महसूल किंवा शिक्षणाची कागदपत्रे आहेत, त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता.   महसूल विभागाकडून जिल्हानिहाय नात वांशावळचे दाखले आणि त्या संबंधी कागदपत्र ऑनलाइन उपलब्ध केली जाणार असल्याची  माहिती मिळत आहे.  

अधिकार मागण्याची क्षमता नागरिकांमध्ये निर्माण होणे महत्त्वाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सरकारने लोकांना त्यांची ओळख निर्माण होऊ देणे आणि त्यांची दखल घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या तक्रारी मांडण्याची, अधिकारांची मागणी करण्याची क्षमता नागरिकांमध्ये निर्माण होणे आणि त्यांना त्यासाठी मार्ग उपलब्ध असणे, यामध्ये या दखल घेण्याचा मोठा वाटा असतो,” असे मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज व्यक्त केले. आशिया-प्रशांत भागातील वकील, न्यायाधीश, विधी सल्लागार संघटना यांच्या ‘लावासिआ’ या संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेत न्या. चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले, “स्वतःला काय हवे त्याची निवड करण्याचे आणि आपल्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याची पात्रता म्हणजे स्वातंत्र्य आहे. व्यक्तीची ओळख ही त्याने केलेल्या निवडीतून स्पष्ट होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!