दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्गच्या मुर्टा शिवारात बिबट्याची दहशत बिबट्या जेर बंद का होत नाही

एका गरीब शेतकऱ्याच्या तब्बल १० शेळ्यांचे नरडी फोडली

वन विभागाचे चक्क दुर्लक्ष

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्गच्या मुर्टा शिवारात बिबट्याचा धुमाकुळ घातला असुन भल्या सकाळी त्यांने तब्बल १० शेळ्यांचा फडशा पाडला आहे.या भागात वारंवार बिबट्या दिसत असतांना त्याला जेरबंद करण्यास वनविभाग असमर्थ ठरला आहे. बिबट्याची दहशत या परीसरात पसरली असुन वनविभागाने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी केली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासुन तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग परीसर मुर्टा, श्रीक्षेत्र रामतीर्थ परीसर, कंदुरमळा यासह अनेक भागात बिबट्या दिसल्याचे अनेकजण सांगत आहेत, सध्या या परीसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. बिबट्याने अनेक प्राण्यांचा बळी घेतला आहे. असे आसतांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग कांहीच उपाययोजना करीत नाही. नागरीकांनी बिबट्या पहिल्यानंतर वनविभागाला कळविले जाते यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी येऊन भेट देण्याचे नाटक करुन परत जातात. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. या बिबट्याची दहशत या परीसरात पसरली आहे.
दि. 30 मार्च रोजी भल्या सकाळी मुर्टा शिवारातील लक्ष्मण कोळी यांच्या दहा शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला आहे. बिबट्याने एक शेळी सोबत नेली आहे तर इतर शेळ्या व बकऱ्यांना त्यांने ठार केले आहे.ऐन गुढी पाडवा सणाच्या दिवशी लक्ष्मण कोळी यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. लक्ष्मण कोळी यांच्या दहा शेळ्या बिबट्याने ठार केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळविली असुन वनविभागाने तात्काळ या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कारवाई करावी व लक्ष्मण कोळी यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कमलाकर चव्हाण यांनी केली आहे.
दि. 29 मार्चच्या रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास अलियाबाद शिवारात आपलं घर प्रकल्प परीसरात नळदुर्ग येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे यांनी राष्ट्रीय महामार्गालगत वाघ पहिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नळदुर्ग परीसरात बिबटया आणि वाघ यांचे वास्तव्य असल्याचे समोर येत आहे. नागणे यांनी अगदी जवळुन या वाघाला पाहिले आहे. हा वाघ लहान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे हा वाघाचा बछडा आहे की काय असा संशय येत असुन खरेच हा वाघाचा बछडा असेलतर निश्चितच या भागात मोठी मादी वाघीण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या परीसरात कॅमेरे लावण्याबरोबरच ज्याठिकाणी नागरीकांनी वाघ आणि बिबट्या पहिला असल्याचे म्हटले आहे त्या परीसरात जावुन पाहणी करून प्राण्यांच्या पायाचे ठसे घ्यावेत जेणेकरून हा प्राणी नेमका कोणता आहे याची खात्री करावी अशी मागणी होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!