महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारचा मेगाब्लॉक रद्द, पण पश्चिम रेल्वेकडून विशेष ब्लॉक सुरु राहणार.

शनिवार-रविवार सूट्टीच्या दिवशी नोकरदारांनी अनेक मंडळांना भेट देण्याचे बेत आखले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्याचा मेगाब्लॉक रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र लोकलसेवा रविवार वेळापत्रकाप्रमाणे चालणार असल्याने काही लोकल रद्द असणार आहेत.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण कसारा कर्जत, हार्बर-ट्रान्सहार्बरसह बेलापूर-खारकोपर मार्गिकांवरील रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रकालीन बोरिवली ते भाईंदरदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी दिवसा मुंबई लोकलच्या कोणत्याही मार्गावर ब्लॉक असणार नाही. सोमवार ते शुक्रवार मध्य रेल्वेवर १ हजार ८१० लोकल फेऱ्या होतात. रविवारी सुट्टी असल्याने तीनशेहून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे रविवारी १ हजार ४७४ फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!