उद्योगमुख्यपान

‘लिज्जत पापड’च्या जसवंतीबेन पोपट यांचे निधन.


मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगावातील सात महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. सात गृहिणींनी ८० रुपयांच्या भांडवलासह सुरू केलेला पापड उद्योग कोट्यवधी ग्राहकांच्या घरामध्ये पोहचण्यासाठी जसंवतीबेन यांचे मोलाचे योगदान होते. जसवंतीबेन पोपट यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेशी संबधित विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजऋण कायम फेडण्याचा प्रयत्न केला.
‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन जमनादास पोपट (वय ९३) यांचे नुकतेच राहत्या घरी निधन झाले. गिरगावातील शंकर बारी लेन येथील ‘हलिया लोहाणा निवास’ या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य होते. हजारो महिलांच्या हाताला काम देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!