देश-विदेशमुख्यपान

उत्तराखंडमधे सिलक्यारा बोगदा दुर्घटनेतलं बचाव कार्य अद्याप जारी

उत्तरकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्य चालू आहे . बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून कामगारांना लवकरात लवकर वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सैद अता हसनैन यांनी काल सांगितलं. परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे मात्र तिथं कार्यरत असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय सैन्यासह विविध प्राधिकरणांनी आवश्यक ती सर्व पावलं उचलली आहेत, असं ते म्हणाले. अडकलेल्या कामगारांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी उपकरणं पाठवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या बचाव कार्याविषयी खळबळजनक वृत्त पसरवू नये, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दूरचित्रवाणी वाहिन्यांना सांगितलं आहे. काल जारी केलेल्या सूचनांनुसार बोगद्याच्या जवळून कोणतंही थेट प्रक्षेपण, किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असा सल्ला मंत्रालयानं दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!