महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान

फटाके स्टॉल लावण्यासाठी 6 ऑक्टोंबरपर्यंत प्रस्ताव मागविले.

धाराशिव,दि.22. प्रतिनिधी संतोष खुने:

प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगीसाठीचे अर्ज 25 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2023 या कालावधीपर्यंत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत करावेत. परवानगीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, फॉर्म LE-5, ओळखपत्र, संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र व साक्षांकित नकाशा, संबंधित जागा खाजगी असेल तर जागामालकाचे नाहरकत व जागेचे कागदपत्र, संबंधित पोलिस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र व विहीत परवाना फीस भरणा केल्याचे चालन सादर करावे. परिपूर्ण असलेले प्रस्ताव या कार्यालयात स्वीकारले जातील. विहीत दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे अपर जिल्हादंडाधिकारी महादेव किरवले यांनी कळविले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!