महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

लोकल ट्रेनमध्ये चढताना महिला पडली; रेल्वे पोलिसांच्या मदतीने वाचले प्राण.

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर आलेली लोकल ट्रेन थांबली. यावेळी ट्रेन सुटेल यामुळे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न महिला करत होती. ट्रेनमध्ये चढताना महिलेचा हात निसटला आणि ती प्लॅटफॉर्मवर पडली. यावेळी काही प्रवाशी व रेल्वे पोलिसांच्या मदतीने महिलेचे प्राण वाचले आहेत. सदर घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर आलेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला हात निसटून लोकलच्या खाली प्लॅटफॉर्मवर तोल जाऊन पडली. याचवेळी प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्म वर खेचले. त्यामुळे या महिलेचा जीव वाचला.
ऋषिकेश माने असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. माने यांच्या कर्तव्यदक्ष व प्रसंगावधनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!