दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

१९ वे विद्रोही साहित्य संमेलन

१९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सुप्रसिद्ध संशोधक, विचारवंत मा. डॉ. अशोक राणा यांची ‘युगांतर’मधील भेट. (दि.१३-२-२०२५)
सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या नांदेड शाखेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभासाठी ते आले होते.
२१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे १९ वे विद्रोही साहित्य संमेलन भरत आहे. विषमतावादी व्यवस्थेकडून मानवी हक्क हिरावले गेल्यामुळे शोषित, पीडित व मागास
राहिलेल्या तळस्तरातील माणसांच्या जीवनाचा साहित्य व अनेक कलांच्याद्वारे जागर करणे, त्यांचे प्रश्न देशाच्या वेशीवर टांगणे, व्यवस्थेतील प्रस्थापितांच्या तोंडावरचे दांभिकतेचे बुरखे फाडणे, मराठीतील दुर्लक्षित अशा बहुसंख्यांकांमधील प्रतिभावंतांच्या साहित्य व कलांचा मुक्त आविष्कार करणे या भूमिकेतून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने हे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.प्रा. प्रतिमा परदेशी व कॉ. किशोर ढमाले यांचा ही संमेलने आयोजित करण्यामध्ये प्रमुख पुढाकार असतो.
समतावादी विचारधारेच्या जाणकारांचा या संमेलनास भक्कम पाठिंबा असतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!