देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शोधप्रबंध डाॅ. आंबेडकरांचा; संपादक म्हणून नाव आगलावेंचे!

संजय मेश्राम, पुणे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात एम. एससी. साठी सादर केलेला शोधप्रबंध राज्य शासनाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने २३ वा खंड म्हणून प्रसिद्ध केला आहे. या खंडावर संपादक म्हणून समितीचे सदस्य सचिव डाॅ. प्रदीप आगलावे यांनी आपले नाव लावून पुन्हा एकदा आपली हौस भागवून घेतली आहे.
प्रकाशन समिती गेली कित्येक वर्षे बाबासाहेबांचे लेखन व भाषणे संकलित करून प्रसिद्ध करीत असते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डाॅ. सुखदेव थोरात यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोलंबिया विद्यापीठातील हा शोधप्रबंध समितीला प्राप्त झाला आहे. समितीने प्रकाशित केलेल्या खंडात संपादकीय लिहिताना डाॅ. आगलावे यांनी सर्वांत शेवटी स्वत:चा उल्लेख सदस्य सचिव असा केला आहे. मग मुखपृष्ठानंतरच्या आतील पृष्ठावर ते स्वत:चा उल्लेख ‘संपादक’ असा कसे काय करू शकतात? वसंत मून हे सदस्य सचिव असताना स्वतःचा उल्लेख ‘एडिटेड बाय’ आणि ‘संपादन’ असा करीत.
समितीने ‘संपादक’ हे पद कधी निमार्ण केले? त्या पदावर डाॅ. आगलावे यांची नियुक्ती नेमकी कधी केली? खुद्द डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रबंधावर संपादक म्हणून कुणी लिहू शकतो? असे प्रश्न उपस्थित होतात. हा पायंडा अतिशय घातक ठरू शकतो.
माहिती अधिकार कार्यकर्त्याने डाॅ. आगलावे यांच्या संपादक पदाबाबत माहिती अधिकारात विचारणा केली असता, समितीने पाठवलेल्या पत्रात ‘स्पष्टीकरणात्मक माहिती असल्याने देता येत नाही, असे म्हणत पळवाट शोधली आहे.

हे ‘संघर्ष’ महाशय कोण?

सदस्य सचिव या नात्याने संपादकीय लिहिताना डाॅ. आगलावे यांनी खंड निर्मितीसाठीच्या सहकायार्बद्दल काही मान्यवरांचे आभार मानले आहेत. यात ‘संघर्ष’ या व्यक्तीचाही उल्लेख आहे. ही व्यक्ती नेमकी कोण? त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव न लिहिण्याचे का टाळण्यात आले. तिचे नेमके काय योगदान आहे, याविषयी सामान्यांच्या मनात प्रश्न आहेत. माहिती अधिकारात या विषयी विचारणा करण्यात आली. मात्र खुद्द समितीनेच हात वर केले आहेत. समितीने ‘माहिती उपलब्ध नाही’ असे हास्यास्पद उत्तर दिले आहे. समिती सदस्य काय लिहितात, त्याची माहिती समितीला नसावी, किंवा त्याची शहानिशा करू नये, यापेक्षा भोंगळ कारभार काय असू शकतो?

संजय मेश्राम, पुणे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!