व्ही एस पँथर्स च्या वतीने संविधान दिनानिमित्त 448 फुटी तिरंगा ध्वज पदयात्रा आणि संविधान दालन ची उभारणी .

लातूर : येथील व्ही एस पँथर्स युवा संघटनेच्या वतीने आज संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत 448 फुटी तिरंगा ध्वज घेऊन भव्य पदयात्रा व्ही एस पँथर्स सं अध्यक्ष विनोद खटके आणि प्रदेशाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
यावेळी प्रथमतः डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले यानंतर पूज्य भन्ते पैय्यानंद यांनी प्रस्ताविकेचे वाचन केले यावेळी जिल्हा बँकेचे बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाट, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार केशव कांबळे, बालाजी कांबळे, ख्रिस्ती धर्मगुरु ,हिंदू धर्मगुरु ,मौलवी ,मुस्लिम समाजाचे नेते अफजल कुरेशी, ला.रा. शेख,विकास कांबळे यांची देखील उपस्थिती होती .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत