मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

पीडित तरुणाच्या परिवारास वंचित न्याय देणार..!!

मौजे: टाकळी
ता.लातूर.
दि:१७/०१/२०२५..

लातूर तालुक्यातील मौजे टाकळी या छोट्याशा गावामध्ये अगदी गरीब कुटुंबातील एक अल्पवयीन तरुण- माऊली उमाकांत सोट जो आंबेडकरी चळवळीशी जुडलेला,आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा होता, हेच गावातील काही प्रस्थापित लोकांच्या पोटात दुखत होते, म्हणून सदर पीडित तरुणास प्रेम प्रकरणाचे कटकारस्थान रचून, त्याला पद्धतशीरपणे गावाच्या बाहेर बोलावून आठ दहा जणांच्या समाजकंटकाच्या टोळीने वेगवेगळ्या शस्त्राच्या साह्याने जोरदार हमला केला आणि तो तरुण जवळपास तब्बल दोन महिने लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता, मृत्यूशी झुंज देत होता परंतु अखेर तरुणाचा त्याचा अंत झाला. त्याच्या मृत्यू मुळे संबंध तालुका लातूर शहरात एकच खळबळ उडाली.
सदर घटना वंचित बहुजन आघाडी लातूर ला कळताच जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांनी तात्काळ घटनास्थळी
पीडित परिवाराची भेट घेण्यास कळविले असता लागलीच बहुजन आघाडी च्या वतीने लातूर तालुका अध्यक्ष सुनीलभाऊ कांबळे, जिल्हा सचिव प्रा. प्रशांत उघाडे, लातूर शहराध्यक्ष मा.सचिनजी गायकवाड, यांनी तत्काळ परिवाराची सांत्वन पर भेट घेतली, व परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्ह्याच्या वतीने येत्या प्रजासत्ताक दिनी गांधी चौक-लातूर, येथे पीडित परिवाराच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी, परळी येथील संतोष देशमुख , व मौजे टाकळी येथील माऊली सोट या तिन्ही प्रकरणा वरती असणार आहे असा इशारा वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष माननीय सय्यद सलीम यांनी दिलेला आहे. सदर प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरिता हे आंदोलन असणार आहे. पीडित परिवाराच्या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत, वंचित बहुजन आघाडी स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी लातूर जिल्हा, शहर, तालुक्याच्या वतीने देण्यात आली आहे. परिवारास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले.

VBA लातूर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!