
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक अपघात झाला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये ८ चिमुकली मुलं जखमी झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील संगम सैराट चित्रपटगृहाजवळ आज सकाळी शाळेत जात असताना ऑटो-रिक्षा आणि ट्रकची धडक झाली. ज्यामध्ये आठ शाळकरी मुले जखमी झाली. प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा मुलांना शाळेत घेऊन जात असताना ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा पलटी झाली, त्यात मुले जखमी झाली. तर त्यामध्ये एक मुलगी गंभीर झाल्याचं सांगितलं जातं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत