देश-विदेशमुख्यपान

आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा गोळा करण्यास केली सुरुवात.

‘इस्रो’ने २ सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल-१ हे अवकाशयान अंतराळात पाठवलं. मागील १७ दिवसांपासून हे अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेत घिरट्या घेत होतं. दरम्यान, आदित्य एल-१ ने मंगळवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीचा निरोप घेतला. आदित्य एल-१ हे यान आता सूर्याच्या दिशेने रवाना झालं आहे.

‘आदित्य’ला अंतराळातील एल-१ या बिंदूपर्यंत प्रवास करायचा आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान हा असा बिंदू आहे जिथून आदित्य एल-१ हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार आहे. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आलं आहे. एल-१ बिंदूजवळ पोहोचल्यावर हे अवकाशयान इस्रोला सूर्याची माहिती देत राहील.

आदित्य एल-१ या अवकाशयानाने पृथ्वीभोवती चार वेळा कक्षा बदलली आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाच्या पलीकडे गेलं आहे. हे यान एल-१ बिंदूवर पोहोचल्यानंतर इस्रोला प्रभामंडळाचा अभ्यास करता येईल. त्यानंतर सौरमोहिमेच्या संपूर्ण कालावधीसाठी हे अवकाशयान तिथेच राहील. एल-१ पॉईंट म्हणजेच लँग्रेज पॉईंट. प्रसिद्ध इटलियन-फ्रेंच गणितज्ज्ञ जोसेफ लुई लँग्रेज यांच्या नावाने या बिंदूला एल-१ पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे.

दरम्यान, आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल, आयॉन्स आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करेल, असे इस्रोने सोमवारी सांगितले. १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पटीने जास्त आहे. आता हे यान ९० हजार किलोमीटरहून पुढे गेलं आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून ५०,००० किलोमीटर पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सुरळितपणे काम करत असल्याचं इस्रोने सांगितलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!