दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपान

भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांना दैनिक जागृत भारत तर्फे भावपूर्ण आदरांजली

डॅा. मनमोहन सिंग यांची खरी किंमत एक ना एक दिवशी आपल्याला नक्की कळेल असं अजूनही वाटतं.
मनमोहन सिंग केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाची खऱ्या अर्थानं जगाला ओळख झाली. नरसिंहा राव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यापैकी पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची कवाडं जगासाठी खुली केली. आज परदेशी गुंतवणूक हा आजचा परवलीचा शब्द बनलाय..त्याचे प्रणेते डॉ. मनमोहन सिंग होते.

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला उद्योग आणि व्यापाराचं धोरण बदलून देशभरच्या अर्थव्यवस्थेला कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योग प्रधान किंवा सेवा प्रधान अर्थव्यवस्था बनवण्यात मनमोहन सिंगांचा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा वाटा होता.

देशावरील आर्थिक संकट टाळण्यासाठी त्यांनी केलेले उपाय प्रभावी ठरले. जगभरातील अर्थतज्ज्ञांची त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर 1998 ते 2004 या कालावधीत ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं.

2004 साली काँग्रेस नेतृत्त्वाखालील यूपीए सरकार सत्तेवर आलं. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शेवटच्या क्षणी पंतप्रधान होण्यास नकार दिला. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, आधार कार्डची अंमलबजावणी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले.

2008 साली अमेरिकेसोबत करण्यात आलेला अणूकराराला मूर्त रुप देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. हा करार होऊ नये म्हणून डाव्या पक्षांनी पूर्ण प्रयत्न केले. त्यावेळी यूपीए सरकार डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून होतं. पण, मनमोहन सिंग यांनी त्यांचा विरोध धुडकावून लावून अणूकरा पुढं नेला. त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला झाला. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा काँग्रेसल फायदा झाला. काँग्रेस आणि युपीएचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं. मनमोहन सिंग यांनी सरकारला गतिमान अर्थकारणाचा चेहरा दिला!

दशकापूर्वी सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली होती याची आता खंत वाटते. राजकीय प्रगल्भतेकडे आम्ही प्रवास करू शकलो नाही हे वास्तव आहे. अलविदा सिंग साहब! 🙏🏻😞😔🙏🏻

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!