पारस येथील शेतक-यांची जमीन औष्णिक विद्युत साठी अधिग्रहित केली असून सौर ऊर्जा प्रकल्प फसवणूक करणारा असल्याने हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही – सुजात आंबेडकर.


पारस येथील शेतकऱ्याची ११०.९१ हेक्टर शेतजमीन शेती २०११ मध्ये नवीन विस्तारित औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अधिग्रहित केली होती. त्या जागेवर अद्यापही औष्णिक प्रकल्प उभारण्यात आला नाही. आता महानिर्मितीच्यावतीने अधिग्रहित जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्या जात आहे.ही शेतकऱ्याची फसवणूक असून ह्या प्रकल्पातून रोजगार निर्मिती होणार नसून ज्या प्रयोजनासाठी घेतली तो औष्णिक विद्युत प्रकल्प सोडून सौर ऊर्जा प्रकल्प केल्यास तो होऊ देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पारस येथे प्रस्तावित प्रकल्प आणि बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्या नंतर पत्रकराशी चर्चा करताना दिला आहे.
पारस येथे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग अशी कनेक्टिव्हिटी असून तीन धरणे असून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.तसेच कोळसा वाहतूक साठी रेल्वे ट्रॅक तसेच आधीच्या औष्णिक विद्युत केंद्र साठी प्रशासकीय इमारती आणि अधिकारी कर्मचारी निवास इमारती असून अधिक बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे.मात्र आजवर सत्तेत आलेल्या सर्व राजकीय पक्षांनी हा प्रश्न मार्गी लागला नाही.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आक्रमतेने हा लढा टप्याटप्याने उभा करण्याचा निर्धार केला आहे.
मुळात हा निर्णय केंद्रात असलेल्या आणि राज्यातील भाजप सरकारचे पाप आहे.त्याचा पुरावा म्हणजे
विधान सभेत १३४ (१०) नुसार महानिर्मिती आणि एनटिपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत (१५) ४६७८५ दि. २०-०९-२०२२ तत्कालीन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला खुलासा खरा प्रकार स्पष्ट करते.
खुलासा करताना फडणविस सांगतात:-
(१) केंद्र शासनाच्या अल्ट्रा मेगा नवीकरणीय ऊर्जा पार्क योजनेच्या पर्याय क्रमांक ८ च्या माध्यमातून महानिर्मिती कंपनीव्दारा नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन समवेत संयुक्त उद्यम कंपनीच्या माध्यमातून राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदरहु सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत महानिर्मिती व एनटीपीसी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लागणाऱ्या जागेसाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रसिध्द केली असून, या अनुषंगाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अंतिमतः जमीन निश्चित करण्यात येणार आहे हे खरे आहे काय,
३) असल्यास, सदर प्रकरणी जमीन निश्चिती करण्यात आली आहे काय,
( (४) असल्यास राज्यात कुठे कुठे जमीन निश्चित करण्यात आली, तथा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया कोणत्या स्थितीत आहे ?
श्री. देवेंद्र फडणवीस (१५-११-२०२२) : (१) होय, शासन निर्णय दिनांक १ जुन, २०२२ अन्वये केंद्र शासनाच्या सौर पार्क योजनेतील अल्ट्रा मेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क या घटकांतर्गत राज्यात अल्ट्रामेगा नवीकरणीय ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर संयुक्त उद्यम कंपनीव्दारे राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.
(२) व (३) होय, या संदर्भात महानिर्मिती कंपनी व नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात दिनांक २० फेब्रुवारी, २०२० रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. सदर २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱ्या जमिनीबाबत महानिर्मिती कंपनीव्दारे स्वारस्य निविदा दिनांक १८/०९/२०१९ रोजी वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर स्वारस्य निविदे अंतर्गत एकूण ३९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, अद्यापि याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
वरील पुरावा म्हणजे भूमिपुत्र आणि स्थानिक तरुणाची भाजपने फसवणूक चालवली असून अमित शाह ह्याचे मुलाची कंपनी आणि गुजराती कंपन्या मार्फत शेतकऱ्याची जमीन लाटून सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न यशस्वी होवू देणार नाही असेही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
ह्यावेळी पत्र परिषदेत प्रदेश प्रवक्ते डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे, जिल्हा परिषद सदस्य प्रगती दांदले आणि वंचीतचे
पदाधिकारी व बाधित शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. टर्न #पारस #औष्णिकविद्युतकेंद्र #सौरऊर्जा #SujatAmbedkar@followers
VBAforyouth
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत