महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी.

ठाणे शहरात मंगळवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजित करण्यात आले होते. या सभेपूर्वी जरांगे यांच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली. रॅलीमुळे खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला. वाहन चालकांना अवघ्या १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता. दुपारी अवजड वाहतूक सुरू होताच कोंडीत वाढ झाली.

खारेगाव टोलनाका, माजिवडा उड्डाणपूल, नितीन कंपनी मार्गे पाचपाखाडी येथून राम मारुती रोड, तलावपाली मार्गे गडकरी रंगायतन अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल लागू केले होते. तरीही या कालावधीत रॅलीच्या कालावधीत शहरात कोंडी झाली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!