धनंजय मुंडे, तुम्ही राजकारण सोडायला हवं! स्वराज्याचे पावित्र्य टिकेल. !!!
धनंजय राव तुम्ही कमी वयात खुपच ऐश्वर्य भोगले, मग ते सत्तेचे असो की अन्य,,,. कोणत्या अभ्यासावर आणि अनुभवावर तुम्हाला मागील मंत्रीमंडळात राज्याचे कृषी मंत्री केले, त्या अगोदर राज्याचे समाज कल्याण मंत्री, पण तुम्ही कोणाचे ‘कल्याण ‘केले हे आज सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पहातोय, करूणाताई पासुन ते जनते पर्यत सगळयांना तुम्ही ‘कल्याण ‘म्हणजे नेमकं काय असते याचा अर्थ शोधण्यास भाग पाडले, मुंडे तुमचे भाग्य आहे खुप कमी वयात तुम्हाला अजित दादा, अमित शहा, आणि मोदींनी वरदाहस्त डोक्यावर ठेवून इथेच स्वर्ग सुख भोगायला संधी दिली, ती इतकी सहज कोणालाही मिळत नाही, पण तुम्ही जनतेला घोडे लावून ते कमावले मुंडे साहेब तुम्ही तर सत्तेचा माज खुपच उंची वर नेऊन ठेवलाय .तुम्ही शिवबाच्या मातीची ‘आन ‘ घेऊन फुले, शाहु, आंबेडकर यांच्या नावाचा जप करत लहानाचे मोठे झालात, पण तुमची नीतिमत्ता इतकी खालच्या पातळीवर गेली कि, एका तरूण तडफदार सरपंचाची क्रुर पणे हत्या घडवून आणली, या महाराष्ट्राच्या मातीला तुमच्या जन्माची लाज वाटली, एका करूणाताई च्या स्त्रीत्वाचा ‘भंग’करून तीला जेव्हा वारयावर सोडली तेव्हाच तुमच्या सत्ता पिपासु वृत्तीचा महाराष्ट्राला प्रत्यय आला होता ,पण तुमच्या सारखे राजकीय मित्र आज बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांना आपलेसे वाटतात, त्यामुळेच मंत्रीपदासाठी तुमच्या नावाची शिफारस झाल्यावर स्वछ अमित भाईनी बेस्ट चा CR चा शिक्कामोर्तब करून मंत्रीपदासाठी तुमची वर्णी लागली आणि तुमच्या जिगरी मित्राचा माज वाढला आणि एका निष्पाप संतोष देशमुख सारख्या उदयमुखी राजकीय नेतृत्वाचा बळी घेतला गेला, या कृत्यामुळे तुमचे काळवंडलेले तोंड दाखवण्याची पण तुम्हाला लाज वाटली आणि कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेऊन तुम्ही ‘नाँट ‘रिचेबल झालात हे कशाचे धोतक आहे,? पण मुंडे साहेब हे तुमचे एकटयाचे पाप नाही हे ही तितकेच खरे. कारण तुमच्या दादा वर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप स्वत पंतप्रधानांनी केले आणि नैतिकतेचे धिंढोरे काढुन त्यांचाच राज्याभिषेक घडवून आणला मग तुमचेच काय वाकडे होणार ना, ??तुम्ही तर दादाचे उजवे हात.
पण धनंजय राव खूप अति झाले तुम्ही आयुष्यात कधी छत्रपती ,शाहू ,फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करू नका, ती नैतिकता जपता आलीच नाही तुम्हाला ,त्यामुळे शिवबाच्या पावलांनी पवित्र झालेली माती आता तुम्ही कलंकित करण्याचे पाप करू नका ,नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तुम्हाला ‘खलनायकच ‘ म्हणून मरावे लागेल, कारण ही माती अनेक शूरवीरांच्या रक्ताने लाल झालेली आहे, याच मातीला संतांच्या वाणीचा सुगंध आहे ,आणि याच मातीला महामानवांच्या विचाराचा वारसा आहे, हे पावित्र्य राखण्यासाठी तुमच्या सारख्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी राजीनामे देऊन राजकीय संन्यास घेतलेला सगळ्यात चांगला, किमान कष्टकरी सुखाचा घास तरी खाईल, बाकी तुम्हारा ‘जमिर’..!.
,,,,,,,,,,,लेखन, संतोष कांबळे, (पत्रकार, विद्रोही लेखक, 8999180009)……………….!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत