प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

पुणे – सोलापूर महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू.

पुणे – सोलापूर महामार्गावर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लोणी काळभोर परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश विठ्ठल हवालदार (वय २६), आदित्य हरिदास साठे (वय २६, रा. दोघे रा. महादेवनगर, हडपसर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश आणि आदित्य पुणे-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे निघाले होते. कदमवाक वस्ती परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी आदित्य गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि आदित्य यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्या शोध घेण्यात येत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!