फडणवीस साहेब तुम्हाला नाही कळणार निष्पाप शहिदांचा आक्रोश,,,,,, !!!

संतोष कांबळे (पत्रकार, विद्रोही लेखक, 8999180009)
साहेब तुम्ही दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालात, अनेक आया -बहिणीनीं तुम्हाला साखर भरवली, मी पुन्हा येईल, पुन्हा येईल हा वादा खरा करून दाखवला पण येण्याचे दार जनतेला माहित आहे ? असो, पण साहेब तुमच्या पायाने पेशवाई परत आली कि काय असेच वाटले, परभणीत संविधान विटंबना, बीड मधे विद्यमान मंत्र्यांच्या गुंडांनी केलेला सरपंचाचा खून हे कशाचे संकेत आहेत? हे समजणारांना समजले ,पण तुम्ही विटंबना करणारा माथेफिरू आहे हे केलेले निवेदन अतिशय खेदजनक आहे, कारण या राज्यात आतापर्यंत डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अवमान असो की संविधान विटंबना ,दलित आई-बहिणी वर टाकलेला हात हा कधीच माथेफिरू ने केलेले कृत्य नव्हते ,त्या घटना तुम्ही तपासून पाहण्याची आवश्यकता आहे, पण परभणी घटनेवर तुम्ही छानच सावरा -सावर केली. तो तुमचा राजकीय स्वभावच आहे, हे काही आश्चर्य नाही.पण फडणवीस साहेब हे सगळे संविधान आणि दलितांच्या संदर्भातच का घडते हे अजून तुम्हाला उलगडत नाही ??आणि थांबवता पण येत नाही ?? बीड जिल्ह्यात एका दलित वाँचमनची बाजु घेतली म्हणून सरपंचाची क्रुर पणे हत्या केली जाते ,हे सगळे मन सुन्न करणाऱ्या घटना घडतात आणि मुंबईत मात्र सगळे आमदार मंत्रीपदासाठी बाशिंग बांधून तयार, एकाच्या पण चेहरयावर पुरोगामी महाराष्ट्रात निष्पाप बळी गेल्याचे दु:ख दिसले नाही, आता मंत्रीपदे पदरात पडले की सगळे जण कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सरकारी गाडीने जातील, पण ज्या माय -बापाचा हाता तोंडाला आलेला घास हैवानी पोलिस यंत्रणेने हिरावून घेतला, म्हातार पणाची काठी मोडून काढली त्यांच्या वेदना कळण्या इतकी संवेदना फडणवीस ‘पेशवाई ‘कडे आहे का हे येणारा काळच सांगेल. पण साहेब पुरोगामी महाराष्ट्रात छत्रपती, शाहु, फुले,आंबेडकरांचे नाव घेऊन आता तुम्ही राजकीय पोळी भाजणे बंद करायला हवे, निदान त्या महामानवांची होणारी अवहेलना तरी थांबेल, पण तुमच्या राजकीय पापात जाणारे निष्पाप लोकांचे बळी आणि त्यांचे कुंटुबांचा आक्रोश एक दिवस तुम्हाला पायाखाली घेतल्या शिवाय रहाणार नाही ,हे ही सत्य.!!
,,,,,,,,लेखन, संतोष कांबळे (पत्रकार, विद्रोही लेखक, 8999180009)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत