इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशनला विद्यापीठाचा दर्जा…

संस्थेच्या नवी दिल्लीसहित अन्य पाच प्रादेशिक केंद्रांनाही तो लागू असून त्यात अमरावती केंद्राचा समावेश आहे. पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशनला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सल्ल्यावरून केंद्रीय शिक्षण विभागानं अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. IIMC ला मिळालेल्या अभिमत विद्यापीठाच्या दर्जाबद्दल सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम राबवता येतील,त्यातून तरुणांना संधी मिळेल आणि या क्षेत्रातल्या संशोधनाला वाव मिळेल असं त्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत