प्रा. डॉ. अनंत राऊत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याची चौकशी करून गुन्हेगारांना कडक शिक्षा द्यावी

प्रा. डॉ. अनंत राऊत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याची चौकशी करून हल्याचा मुख्य सूत्रधार कोण?याचा शोध घ्यावा आणि यापुढे असे गुन्हे घडू नयेत यावर प्रशासनाने पाऊले उचलवीतp अशा आशयाचे निवेदन विविध संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले.
16 जानेवारी 2025 रोजी प्रा. डॉ. अनंत राऊत यांच्यावर पीपल्स कॉलेज, नांदेड येथे दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान जीवघेणा प्राणघातक हल्ला झाला यावर 19/01/2025 रोजी विविध संघटनाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली
यावेळी शासन आणि प्रशासन यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला.आणि आज दिनांक 20/01/2025 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देवून अशा प्रवृत्तीला पायबंद करावा आणि या प्राणघातक हल्याचा सूत्रधार कोण? याचा शोध घेवून यापुढे अशा घटना घडणार नाहीत याकडे लक्ष दयावे असे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी माजी खासदार मा.डॉ. व्यंकटेश काब्दे साहेब, प्रा.डॉ.अनंत राऊत, दत्ता तुमवाड, प्रा. देविदास इंगळे, प्रा. गौतम दु्थडे, प्रा. डॉ .बालाजी पोतूलवार, आनंदा बनकर, दिगंबर घायाळे, डॉ. ए.टी .सूर्यवंशी, पिलगुंडे, असोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत