महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

पुण्यात ‘जातवार’ जनगणनेवर कार्यशाळा.पूणे जिल्हा प्रतिनिधी प्रा. डी. बी. धावारे ( १९जानेवारी) शिरूर.

पुणे : महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण जातीय ताणतणावाने ग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांमधील संवाद आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने ‘जातवार जनगणना’ या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन २१ जानेवारी (रविवार) रोजी आझम कॅम्पस (पुणे) येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. ए. इनामदार हे करणार आहेत, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी दिली.

भारतात जातवार जनगणनेचा प्रश्न प्रलंबित आहे. जोपर्यंत ‘जातवार जणगणना ‘ होत नाही, तोपर्यंत कोणत्याही आरक्षणाची योग्य अंमलबजावणी शक्य होणार नाही. परंतु, जनगणनेच्या मागणीचा पाठपुरावा होताना दिसत नाही. विविध राजकीय पक्ष हे निवडणुकीवेळी जातवार जणगणनेविषयी आश्र्वासने दिली जातात आणि सत्तेत आल्यानंतर ती आश्र्वासने पाळली जात नाहीत. मात्र, बिहारमध्ये राज्यस्तरीय जात जनगणना घेण्यात आली आणि मागासलेपणाविषयी धक्कादायक निष्कर्ष पुढे आले. या पार्श्वभूमीवर किमान महाराष्ट्रात या विषयावर चर्चा विमर्श व्हावा, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेतील पहिल्या सत्रात ‘जातवार जनगणना : सैध्दांतिक दृष्टिकोन’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे हे मांडणी करणार आहेत. तसेच ‘जातवार जनगणना आणि जातिअंताची दिशा’ या विषयावर  गंगाधर बनबरे  (पुणे) आणि देवेंद्र इंगळे (जळगाव) हे मांडणी करणार आहेत. तसेच ज्येष्ठ विचारवंत प्रदीप ढोबळे (मुंबई) हे समारोप सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. प्रा. प्रकाश पवार (पुणे), यशवंत झगडे (मुंबई) आणि दयानंद माने (पुणे) हे कार्यशाळेत चर्चक म्हणून सहभागी होणार आहेत.

राज्यभरातून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले कार्यकर्ते, विद्यार्थी, संशोधक, पत्रकार या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिलीप चव्हाण यांनी केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!