धम्म हा आचरणाचा आहे धम्म प्रचारक बौद्धाचार्य व्ही जी सकपाळ
सारनाथ बुद्ध विहार मानीपाडा येथे वर्षावासानिमित्त धम्मदेशना कार्यक्रमाचे 29 वे पुष्प बौद्धाचार्य तसेच उत्कृष्ट धम्म प्रचारक व्ही जी सकपाळ यांच्या हस्ते पार पडला. यामध्ये धम्म प्रचारक व्ही जी सकपाळ यांनी धम्मा विषयी मार्गदर्शन करताना, दानपारमीतेचे महत्व अत्यंत कुशलतेने विशद केले. तसेच धम्माचे अनेक पैलू त्यांनी उलगडले. दानाबद्दल त्यांनी दान, अदान आणि नादान याचेही विश्लेषण केले.
व्ही जी सकपाळ यांनी अत्यंत सुरील आवाजामध्ये त्रिसरण पंचशील घेतले बुद्ध पूजा केली तसेच धम्माबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले संयोजक आणि व्ही जी सकपाळांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत