तुम्हाला वडापाव खायला आवडतो? वडापाव खाल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात? जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात…

वडापाव हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोकांची भूक भागवणारा वडापाव खूप जास्त लोकप्रिय आहे. वडापाव पाहताच तोंडाला पाणी सुटतं आणि गरमा गरम वडापाव खाण्याची इच्छा होते. खरं तर वडापाव जरी चवीला स्वादिष्ट असला तरी आरोग्यासाठी वडापाव कितपत चांगला आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. वडापाव नियमित खाणे चांगले आहे का? वडापाव खाल्ल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात? वडापाव कोणी खाऊ नये? याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी सविस्तर माहिती सांगितली.
आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत सांगतात, “वडापाव हा खूप जुना पदार्थ आहे. कामगार किंवा शारीरिक कष्ट करणाऱ्या वर्गातील लोकांना त्वरित ऊर्जा देण्याच्या हेतूने हा पदार्थ अस्तित्वात आला.
लगेच ऊर्जा देणारा पदार्थ खायचा असेल किंवा काहीतरी चमचमीत खायचं असेल तर हा पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत