हातगाडीवर भजी तळून बेरोजगारांनी केले आंदोलन.

महाराष्ट्रात आणि देशांमध्ये बेरोजगारांची संख्या प्रचंड पटीने वाढत आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक हाताश झालेले आहेत. मोदी सरकार सत्तेवर येताना 2014 साली दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देणार असे आश्वासन दिले होते परंतु वर्षाला दोनशे रोजगार सुद्धा देण्यास केंद्र सरकार असमर्थ ठरले आहे म्हणून शहरातील युवक तरुण सुशिक्षित बेरोजगारांनी भजी तळून सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले आणि सरकारला खडखडून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने त्वरित जागे व्हावे आणि युवकांच्या हाताला त्यांच्या कुवतीप्रमाणे काम द्यावे अन्यथा हा युवक या देशांमध्ये गप्प बसणार नाही याचं भान सरकारने ठेवलं पाहिजे.
पंतप्रधानांनी देशातील बेरोजगारांसाठी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनही युवकांना रोजगार मिळाला नाही. त्यामुळे अनेक युवक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे याला सर्वस्वी पंतप्रधान जबाबदार असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शनिवारी या विरोधात सकाळी पंचवटी चौक परिसरातील एका हातगाडीवर “पकोडे” तळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी आंदोलकांनी लाखो युवांना बेरोजगारीच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र शासनाविरोधात तीव्र नारेबाजी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना वर्षाला २ कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारने युवकांना बेरोजगारीच्या खाईत लोटले. चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीडीपी दर २३.९ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारच्या हलगर्जीपणामुळे फॉक्सकॉनसारखा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. त्यामुळे राज्य शासन अपयशी ठरले असल्याचे युवक काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधानांनी खासगीकरण धोरण अंमलात आणून शासकीय नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला. रोजगार न मिळाल्याने लाखो युवावर्ग नैराश्य, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले आहेत.
अशी टीका युवक काँग्रेसने केली. दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिवस उत्साहात साजरा केला जात आहे. याचा निषेध करत युवक काँग्रेसच्या वतीने पंचवटी चौकात हातगाडीवर शेकडो युवकांनी “पकोडे” तळून मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. या वेळी युवक काँग्रेस शहराध्यक्ष नीलेश गुहे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पंकज मोरे, परीक्षित जगताप, फिरोज शाह, योगेश बुंदेले, उत्कर्ष देशमुख, वैभव देशमुख, शैलेश काळबांडे, शक्ती राठोड, ऋग्वेद सरोदे, अनिकेत ढेंगळे, सागर कलाने, अक्षय साबळे, आदित्य पाटील, सागर यादव, नितीन काळे, अभिजित मेश्राम, करण गायकवाड, शहजाद सौदागर, सनी सावंत, आशिष चव्हळे, रूपेश पुडके, शिवाजी चव्हाण, सुमेध सरदार, तन्मय मोहोड, संकेत साहू, अमित गुडधे, पीयूष अभ्यंकर, निशांत देशमुख उपस्थित होते.
कामगार आयुक्त कार्यालयावर केक कापून केला निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस शनिवारी युवक काँग्रेसने बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. या वेळी कामगार उपायुक्त कार्यालय समोर प्रतिकात्मक केक कापून पंतप्रधानांचा निषेध केला. तसेच युवकांना बेरोजगार करणाऱ्या शासनाचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत