दत्ता दळवी यांच्यावर होणार आज सुनावणी

माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन देण्यास पोलिसांची विरोध दर्शवला. त्यामुळे आणखी एक रात्र दळवी यांना न्यायालयीन कोठडीत काढावा लागणार शुक्रवारी पुन्हा त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
दळवी यांना बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जामिनाबाबत पोलिसांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी गुरुवारी स्थानिक भांडुप न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांकडून त्यांच्या जामिनाला विरोध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक विधान व अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेले दळवी यांना जामीनावर मुक्त केल्यास दोन्ही गटांमध्ये एकमेकांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अटक आरोपीतास जामीन मंजुर केल्यास गुन्हयाचे तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुन्हयातील साक्षीदार यांचेवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. शुक्रवारी सकाळी यावर सुनावणी होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत