मनोज जरांगे कडून उपचार करून घेण्यास सुरुवात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी गावकऱ्यांनी आग्रह केल्यानंतर उपचाराला प्रतिसाद देत रात्री १२.३० वाजता सलाईन घेतले. आज दुपारी ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. रविवार पासून त्यांनी त्यांचे उपोषण तीव्र केले असून त्यांनी उपचार आणि पाणी घेणेही बंद केले आहे. त्यांची प्रकृती ढासळत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. काल सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावत यावर चर्चा करत तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी सोमवारी रात्री १२.३० पासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत