संविधान बचाव.. मोदी हटाव ..!

देशात सध्या घडत असलेल्या घडामोडी कोणाही बुद्धिजीवी व्यक्तीला चीड आणनाऱ्या आहेत. ज्यांनी या सामाजिक जडणघडणीत योगदान दिलेले आहे, समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे त्यांच्यासाठी स्वस्थ बसणे शक्य नाही.
भारतीय दलीत पँथर ही सोलापूर चे विद्रोही लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आयु. आंबादास शिंदे यांनी सामाजिक जाणिवेतून लढवय्या भीम सैनिकांना सोबत घेऊन स्थापन केलेली एक जबाबदार संस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संस्था उल्लेखनीय कार्य करत आहे.
भारतीय दलीत पँथर ने आपल्या कार्यकर्त्यांना एक अभ्यासपूर्ण व मार्मिक आवाहन केले आहे. लोकशाही संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावले पाहिजे या आशयाचे हे निवेदन दैनिक जागृत भारत आपणासाठी उपलब्ध करत आहे.

भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे दि १९ मार्च २०२४
आदेश
सर्व पँथर्स पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सप्रेम जयभीम.
आपणास कळविणेत येते की आपले संघटन हे सामाजिक संघटन आहे ; राजकीय पक्ष नाही हे जाणून घ्या त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण भाग घेणार नाही म्हणजे आपले उमेदवार असणार नाहीत ; कोणत्याही राजकीय पक्षाशी युती नाही; पाठींबा देणार नाही; प्रचार करणार नाही तरच आपल्या संघटनेवर लोकांचा विश्वास व सहकार्य राहील अन्यथा आपणही राजकारण करू लागलो की संघटना संपेल, यामुळे आपले देशाचे नुकसान होईल. आज देश, संविधान, लोकशाही वाचविणे व मोदी हटविणे महत्वाचे आहे; राजकारण महत्वाचे नाही पण प्रत्येकानी प्राणपणाने विरोध केला पाहिजे; दररोज मतदाराला प्रत्यक्ष भेटून जातीय वादी उमेदवार पाडणे महत्वाचे आहे; येणारे सरकार बीजेपी चे असणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे नाहीतर भारतीय संविधान लोकशाही संपून आपण गुलाम होणार आहोत याची खात्री बाळगा. पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर येणार नाहीत. त्यानी आपणास मतदानाचा अधिकार दिला आहे याचा जाणीव व जागृती ने वापर करून आपलेवरील आलेले संकट नष्ट करूया; या बाबत कोणाचेही दुमत नसावे असे वाटते शेवटी एकमेकाचे ऐकणे महत्वाचे असते नाहीतर सर्वनाश अटळ आहे.
जयभीम..!
आपले स्नेहांकित
अंबादास शिंदे : संस्थापक अध्यक्ष
शिवश्री फत्तेसिंह राजे भोसले :
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य दलित पँथर पुणे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत