इतिहासाचे विकृतीकरण
आकाश शिरसाट
RSS चे मोहन भागवत यांनी पुण्यातील कार्यकमात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी टिळकांनी शोधून काढले असे चुकीचं विधान करुन सत्य इतिहासाचे विकृतीकरण केले आहे खोटा इतिहास पसरवण्याचा या ठिकाणी काम केले या मोहन भागवत चा आम्ही निषेध करतो.ज्यांना चड्डीतून पँटीत यायला १०० वर्ष लागली ती चड्डी गँग आज इतिहास शिकवायला लागलेत..सत्यइतिहास बहुजनांनो वाचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८६७ साली देशात सर्वप्रथम पुण्याहून पायी चालत रायगडावर जाऊन शिवसमाधीचा शोध लावला,तीची स्वच्छता व सुशोभिकरण केले व १९ फेब्रुवारी १८६९ शिवजयंती उत्सव सुरू करणे प्रथम हे ऐतिहासिक कार्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून जगात पहिली शिवजयंती पुण्यामध्ये धुमधडाक्यात साजरी केली,छत्रपती शिवाजीराजे भोसले हा पोवाडा लिहून प्रकाशित केला घरोघरी छत्रपतींचे कार्य पोहोचवणे ही सर्व महत्त्वपुर्ण ऐतिहासीक कामे महात्मा ज्योतिबा फुले यांनीच सर्वप्रथम केली आहेत.मग या लोकमान्य लोकमान्य टिळकांनी काय केलं तेही वाचा..
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी.१९१७ मध्ये पुणे शहारातील भांबुर्डी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत शिवप्रेमीजनांची बैठक बोलावली होती.या विरोधात पुण्यातील लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून व काही ब्राह्मणांनी मोर्चा काढून त्या बैठकीवर दगडफेक केली.
याशिवाय शाहू महाराज ज्या जागेवर थांबले होते,तिथे रात्रीच्या वेळी.लोकमान्य टिळकांच्या चिथावणीवरून काही ब्राह्मण तरूणांनी दगडफेक केली,आग लावून देण्याचा प्रयत्न केला.पुणे शहरात शिवरायांचा पुतळा बसू नये हा ब्राह्मणांचा नारा होता,शाहू महाराजांना शिवाजीबद्दल एवढेच प्रेम असेल तर तो पुतळा कोल्हापुरात बसवावा,असे ठराव ब्राह्मण सभेत पास झाला,पण भटांचा विरोध न जुमानता शाहुमहाराज स्मारक समिती चे अध्यक्ष झाले.कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जगातील पहिला पुतळा ठरणार होता.म्हणून,भांबूर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज सैनिक शाळेच्या प्रांगणात हा पुतळा उभारण्याचे ठरवले. शाहू महाराजांच्या प्रयत्नामुळे हा पुतळा पुण्यात बसवण्यात आला त्याचा भूमिपूजन करण्याचा कार्यक्रम ठेवला त्या दिवशी पुण्यातील सर्व हॉटेलही बंद ठेवले व हॉटेल मालकांनी कोणालाही पाणी पाजु नये,असा दम भरला.इंग्रज सरकार असुनही ब्राह्मणांनी त्यांना जुमानले नाही.समारंभात शिवरायांच्या पुतळ्याखाली बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले.पण,जागरूक बहूजन-मराठा शिवप्रेमींमुळे ते शक्य झाले नाही.शेवटी दि. 16 जून 1928 रोजी छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पुतळा (भांबूडी) म्हणजे शिवाजीनगर येथे संपन्न झाला.ब्रिटनचे राजपुत्र सर लेस्ली विल्सन यांचे शुभहस्ते व महाराज जीवजीराव शिंदे यांचे अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला.हजारो शिवप्रेमी या समारंभात सहभागी झाले होते.याशिवाय, देशभरातून सुमारे ५६५ प्रतिनिधी उपस्थीत होते.त्यामुळे अन्न-पाण्याविना सर्वाचे हाल झाले.संस्थेने उपाय योजना केली होती, पण ती अपुरी पडली.इंग्रजांच्या काळातील इ. स.१९२८ ची हि घटना आहे.लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून ज्या क्रुर ब्राह्मणांनी हा प्रकार केला,त्यांचेच वंशज आज स्वार्थासाठी खोटे शिवभक्त,शिवशाहीर झालेत.आणि ते आज आम्हाला इतिहास शिकायला लागले.महात्मा ज्योतिबा फुले यांचे महान कार्य कोणीही विसरू शकत नाही चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही कितीही खोटा इतिहास पसरवण्याचे प्रयत्न केले तरी आम्ही बहुजन समाजाला खरा इतिहास सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खोटा इतिहास आम्ही पसरू देणार नाही हे बाबासाहेबांचे अवलाद आज जिवंत आहे हे आम्ही तुम्हाला इशारा देतो आणि य आर एस एस च्या मोहन भागवत चा आम्ही निषेध करतो..
!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!
आकाश दादा शिरसाट
,जय शिवराय,
जय ज्योती जय क्रांती
🙏.जय भीम.🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत