नळदुर्ग येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
बोरी धरणाचं वरदान लाभलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग शहरात अपुऱ्या होणाऱ्या साठवण टाकी मुळे नळदुर्ग कराना खुप मोठा त्रास अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे , नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आणि शहरातले मूलभूत प्रश्न सोडविण्या साठी यामध्ये प्रामुख्याने पिण्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत होता परंतू हा प्रश्न सोडविण्यासाठी निखळ दूरदृष्टी ठेवून प्रामाणिक पणे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय विकासरत्न आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हा पाणी प्रश्न मात्र खूप चिकाटीने आणि जिद्दीने कायम स्वरूपी मार्गी लावला आहे .नळदुर्ग शहरातल्या सर्व्हे न २९ मध्ये गेली ६० ते ७० वर्षापासून शासकीय जागेवरती राहत असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर मिळावे यासाठी काही लाभार्थ्यांना भोगवटदार म्हणून ८ अ चे ५ दाखले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे त्यामुळे लाभार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्याचे पर्यटन वाढीसाठी किल्ल्याचे संवर्धन करणे आजच्या काळाची गरज आहे यासाठी याचा ही पाठपुरावा आम्ही करत आहोत तुळजापूर तालुक्याची लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नातून नळदुर्ग शहरातील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध व्हावे याकरिता त्यांनी केलेल्या सातत्याच्या पाठ पुराव्या मुळे नळदुर्ग शहरासाठी ४३ कोटी रुपयेच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला
नळदुर्ग शहरासाठी खूप मोठी स्वाभिमानाची आणि बाब असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे हा शुभारंभ नळदुर्ग शहरात वसंत नगर येथे १ लाख ८५००० लिटरची टाकी , हुतात्मा स्मारक उद्यान ८५००० लिटरची टाकी अक्कलकोट रोड १ लाख ६५ हजार लिटरची टाकी जलशुद्धीकरण केंद्र ३ लाख २५ हजार लिटर क्षमता असलेले जलकुंभ उभारणार तर उपजिल्हा रुग्णालय येथे ३ लाख १५००० लिटरची टाकी नळदुर्ग नगरपालिकेच्या जवळ ६ लाख ३५ हजार लिटरची टाकी तर डॉ आंबेडकर नगर समाज मंदिराच्या समोर १ लाख ६५ हजार लिटरची टाकी असून या पिण्याच्या पाणी टाक्या तात्काळ उभारणार आसुन
या टाक्याची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत यांची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे आसे परखड मत तुळजापूर तालुक्यातील लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले .
नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गनलं जातं या शहरात आणि शहरातल्या परिसरातल्या नागरिकांना त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून होर्टी शिवारामध्ये एम आय डी सी होण्याच्या मार्गावर आहे शिवाय नळदुर्ग येथील मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाचे काम हाती घेण्यात आले आहे शहरांमध्ये नवीन रस्त्या साठी ९३ कोटी रुपयेची कामे हाती घेतले आहेत . सर्वात महत्त्वाची योजना ” माझी लाडकी बहीण ” योजना ही कायमस्वरूपी असून प्रत्येक बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये येणारच नळदुर्ग शहरांमध्ये समृद्धी व विविध योजना आनण्या साठी माझ्या माय माऊलीने माझ्या मोठ्या भावाने माझ्या दादाने माझ्या डोक्यावर दोन्ही हात ठेवावे भरभरून आशिर्वाद द्यावा हीच आपल्या कडुन आपेक्षा करतो .कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजीतसिंह ठाकुर हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नळदुर्ग नगरीची माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील बनसोडे यांनी केले . कार्यक्रमासाठी ॲड दीपक आलुरे ,भाजपाचे नेते सुशांत भूमकर , माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के नळदुर्ग नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष नय्यर जाहागीरदार , ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे तानाजी जाधव दादासाहेब बनसोडे उत्तम बनजगोळ भगवंत सुरवसे श्रीनिवास भोसले शिवाजी नाईक अजित चव्हाण ,माजी नगरसेवक सुधीर भैया हजारे बसवराज धरणे माजी नगरसेवक संजय बताले सामाजिक कार्यकर्ते बंडू पुदाले , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव माजी नगरसेवक निरंजन राठोड भाजपाचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे भाजपाचे बबन चौधरी , भाजपाचे नेते नंदगाव चे माजी सरपंच सिद्धू कोरे ,नळदुर्ग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय कोरे , श्रमिक पोतदार लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड ,योगेश सुरवसे , अमित बनसोडे , उत्तम कांबळे भाजपाचे बापू दुरुगकर सचिन बनसोडे प्रकाश बनसोडे प्रभावती सुरवसे हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत