९० मीटरचा पल्ला अर्शदसाठी निर्णायक पॅरिसपूर्वी अर्शदपेक्षा नीरजच सरस
दोघांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास जाणवणारी बाब म्हणजे, नीरजने सुरुवातीपासूनच सातत्याने ८० ते ८५ मीटरचा पल्ला गाठला आणि यश मिळवले. याउलट अर्शदला ८० मीटरच्या पलीकडे फारसे जाताच येत नव्हते. ही परिस्थिती जाकार्ता आशियाई स्पर्धा २०१८ पासून बदलली. त्यावेळी प्रथमच अर्शदने ८० मीटरपल्याड भाला फेकून दाखवला. यानंतर मात्र अर्शदने आपला पल्ला वाढवत नेला, ज्याची फारशी गरज नीरजला पडली नाही. ८५ ते ९० मीटरमध्ये भाला फेकूनही नीरज अनेक स्पर्धा जिंकत होता. पॅरिसमध्ये सुरुवातीसच ९० मीटरपलीकडे भाला फेकून अर्शदने मोठीच मजल मारली. नीरजला त्याच्या कारकीर्दीत आजवर कधीही ९० मीटरपलीकडे भाला फेकता आलेला नाही. त्याची ८९.९४ मीटरची फेक भालाफेकीतील सर्वोत्तम फेकींमध्ये २५वी ठरते.
याउलट अर्शदची ९२.९७ ही फेक ६व्या क्रमांकाची सर्वोत्तम फेक ठरते. त्याने आणखी एकदा त्याच स्पर्धेत ९० मीटरपलीकडे भाला फेकून दाखवला होता. अर्शद नदीम तंत्रापेक्षा ताकदीला प्राधान्य देतो, तर नीरजचा भर तंत्रावर अधिक असतो. नीरजच्याच म्हणण्यानुसार, ९० मीटरपलीकडे जाण्याविषयी त्याने गांभीर्याने विचार केला नाही. कारण तशी वेळच आली नाही. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. कारण येथून पुढे आता नीरजला ९० मीटरपलीकडे भाला फेकण्यासाठी सराव आणि ताकद प्रशिक्षण करावे लागेल.. पॅरिसपूर्वी अर्शदपेक्षा नीरजच सरस
पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने अर्शद नदीमने नीरज चोप्राला पहिल्यांदाच हरवले. यापूर्वी दोघांमध्ये झालेल्या द्वंद्वामध्ये नीरजच सरस ठरला होता. दोघे पॅरिसपूर्वी नऊ वेळा आमने-सामने आले आणि प्रत्येक वेळी नीरज जिंकला. यांतील आठ स्पर्धा सीनियर स्तरावर तर एक ज्युनियर स्तरावरील होती. गुवाहाटीमध्ये २०१६मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सर्वप्रथम दोघे आमने-सामने आले. त्यावेळी नीरज सुवर्णपदकाचा, तर अर्शद कांस्यपदकाचा मानकरी ठरला होता. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज पहिला आला, त्यावेळी अर्शद पाचव्या क्रमांकावर राहिला. पॅरिसपूर्वी दोघे बुडापेस्ट येथे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत आमने-सामने आले, त्यावेळी नीरज पहिल्या आणि अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र पॅरिसमध्ये प्रथमचअर्शद नीरजपेक्षा सरस राहिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत