आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

गडचिरोली पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी, ४० लाखांच्या ३०० मोबाईल शोधण्यात त्यांना यश.

गडचिरोली पोलीसांना सन २०२२ मधे जवळपास २२ लाख किंमतीचे एकुण १५० आणि सन २०२३ मध्ये जवळपास १८ लाखाहून अधिक किमतीचे एकुण १३५ हरवलेले मोबाईल शोधुन काढण्यात यश आले. बहुतांश माेबाईलधारकांना त्यांचे माेबाईल फाेन नुकतेच पाेलीसांनी परत केले.
मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक बनलेल्या मोबाईल चोरीचे व हरविल्याच्या दररोज देशभरात लाखो तक्रारी येतात. अनेकदा चोरी गेलेला मोबाईल सापडत देखील नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी मागील दोन वर्षांत तब्बल ४० लाख किमतीचे फाेन शाेधत जवळपास तीनशे मोबाईल नागरिकांना परत केले.
सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात यावर्षी शोधण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकांना प्रदान करण्यात आले. हरवलेले किंवा चोरी गेलेले मोबाईल शोधण्यात मागील दोन वर्षांत गडचिरोली पोलिसांचा आलेख वाढता असून २०२२ मध्ये २२ लाख किमतीचे १५० तर २०२३ मध्ये आत्तापर्यंत १८ लाख किमतीचे १३५ मोबाईल शोधण्यात त्यांना यश आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!