यशश्री शिंदे, व अक्षता म्हात्रे यांच्यामारेकऱ्यांना फाशी द्या, आर, पी, आय, (आर, के, )ची निषेध धरणे कार्यक्रम
दीपक मदने
मानसिक अस्वस्थामुळे मनाला शांती मिळावी म्हणून अक्षता म्हात्रे ही तरुणी शीळ फाटा येथील घोळ गणेश मंदिरात
गेली होती, मात्र तिच्या असहाय्यतेचा
गैरफायदा घेत तेथील पुजारी यांनी
तिच्यावर अमानुष अत्याचार केले, व तिला हाल हाल करून ठार मारले, सदर घटना मनाला अत्यंत विषन्न करणारी असून मानवतेला काळिमा फासणारी आहे,
तसेच उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे, या मुलीचाही सूड भावनेतून निर्घृण हत्या करण्यात आली,
या दोन्ही घटना मानवतेला कलंकित
करणाऱ्या असून, मारेकऱ्यांना फाशी व्हावी, या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आर, के,)या पक्षाच्या वतीने रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मा, दीपक मदने याच्या व सहकार्याच्या नेतृत्वाखाली धरणे कार्यक्रम आयोजित केला आहे,
दि, ८/८/२०२४ रोजी दुपारी 3 वा,
डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ, एस, टी, डेपो समोर
पनवेल येथे होणाऱ्या धरणे कार्यक्रमात पक्षाध्यक्ष मा, राजाराम खरात आणी अनेक पदाधिकारी सामिल होणार आहेत,
रायगड , पनवेल मधील नागरिकांनी
मोठया संख्येने धरणे कार्यक्रमात सामिल व्हावे असं आवाहन मा, दीपक मदने यांनी केले आहे,
दीपक मदने
रायगड जिल्हा संपर्क प्रमुख
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत