मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर तालुका निर्मितीसाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार

नळदुर्ग तालुका निर्मिती अहवाल मनसे टीमने राज ठाकरे यांच्या कडे सादर केला .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे धाराशिव येथे विधानसभा निवडणुकी संदर्भात चाचपणी करण्यासाठी व पदाधिकारी यांना मार्गदर्शक करण्यासाठी आले होते,याप्रसंगी नळदुर्ग मनसेचे पदाधिकारी यांना आवर्जून भेटीसाठी त्यांनी बोलावलं,मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांनी नळदुर्ग तालुका होण्यासाठी पक्षाच्या वतीने वेळोवेळी आवाज उठवला व शासनाकडे १२५ पानी अहवाल दिला असून,वर्षभरापूर्वी शासनाने कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नवीन तालुके निर्मितीसाठी समिती गठीत केली आहे,त्या समितीची भेट घेऊन हि निवेदन व अहवाल दिल्याचे सांगितले,गेल्या ४० वर्षांपासूनची नळदुर्ग तालुक्याची मागणी असून,अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा विषय सुद्धा बाजूला पडल्याचे सांगितले,यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी व संबंधिताशी बोलू असे पदाधिका-यांना आश्वासित केले आहे,यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,गणेश बिराजदार,सोमेश्वर आलूरे उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!